Pune : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सात्यकी सावरकरांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज़-  स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त पुण्यश्लोक श्री राजा शिव छत्रपती महाराज प्रतिष्ठान आणि मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या  व्याख्यानांचे (Pune)आयोजन करण्यात आले होते.

Delhi : दिल्ली पोलिसांनी आंदोलक महिला कुस्तीपटूंना बळजबरीने ताब्यात घेण्याचा केला प्रयत्न

यावेळी सात्यकी सावरकर म्हणाले,  सेल्युलर जेलमध्ये राहिल्यानंतर सावरकरांमध्ये झालेल्या बदलां बद्दल त्यांनी सांगितले. सावरकरांचा हिंदू म्हणून संघटीत होण्याचा विचार किती महत्त्वाचा आहे हे मांडत, सर्व मतभेद विसरून हिंदू म्हणून एका भगव्या झेंड्याखाली एकत्र यावे असे ते म्हणाले.त्यांच्या सावरकरांच्या कवितेच्या  गायनाने उपस्थित भारावून गेले,

व्याख्यानाची सुरुवात 8 वर्षांच्या मल्हारच्या उच्च उर्जा, प्रेरक भाषणाने झाली.  तुकोबारायांचे वंशज शिरीष मोरे यांनी वीर सावरकर आणि तुकाराम यांच्या विचारांत कसे साम्य होते हे आपल्या ओघवत्या शैलीतून सांगितले.वंदे मातरमने कार्यक्रमाची (Pune) सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.