-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune scholarships News : लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे पुणे जिल्ह्यातील मुलींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) शैक्षणिकदृष्ट्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींना शिष्यवृत्तीद्वारे मदत करते.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये अभियांत्रिकी, विज्ञान आणि फार्मसी या विषयांत पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज मागवण्यात आले आहेत.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म https: //www.lpfscholarship.com या संकेतस्थळावर 1 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. याबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी एलपीएफ वेबसाइट www.lilapoonawallafoundation.com वर भेट देता येईल.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) शैक्षणिकदृष्ट्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींना शिष्यवृत्तीद्वारे मदत करते.

या संस्थेची शिक्षण आणि सबलीकरण करण्याच्या परंपरेची 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिष्यवृत्ती निशुल्क असून याद्वारे मुलींच्या संपुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमाचा खर्च उचलला जातो.

गेल्या 25 वर्षांमध्ये एलपीएफने 9,300 हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांचे जीवन बदलले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.