Pune news: हडपसर परिसरात धुमाकूळ घालणारा तो बिबट्या अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज : मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हडपसर परिसरातील साडेसतरानळी गोसावी वस्ती परिसरात हा प्रकार घडला होता. या सर्व प्रकारानंतर बिबट्या त्याच भागात दबा धरून बसला होता. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर त्याचा शोध घेऊन रात्री त्याला जेरबंद केले. त्या बिबट्याला कात्रज उद्यान आत सोडण्यात आले. 

मंगळवारी सकाळी एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर हा बिबट्या पसार झाला होता. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गोसावी वस्ती येथील घराच्या बोळामध्ये त्याचा वावर असल्याचं नागरिकांना आढळलं. काहीसा जखमी झालेला हा बिबट्या याठिकाणी शांतपणे बसला होता. परंतु माणसाची चाहूल लागताच त्यांनी पुन्हा गुरु करण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान वन विभागाच्या पथकाने आणि रेस्क्यू टीम च्या कर्मचारी त्याला इंजेक्शनचा डॉट मारून बेशुध्द केले आणि रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याला जेरबंद केले. बिबट्याला पकडण्याचे हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर त्याला कात्रज येथील उद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.