Pune News: कात्रज बोगद्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Pune News: Leopard dies in unidentified vehicle collision near Katraj tunnel बिबट्याच्या डोक्याला वाहनाची जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

एमपीसी न्यूज- कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी (दि.13) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले झाले होते. परंतु, बिबट्याच्या डोक्याला वाहनाची जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अपघात होउन बिबट्या मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.