Pune News : पुण्यातील अहिरे गावातील बिबट्या अखेर जेरबंद

एमपीसी न्यूज-पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात ( Pune News) आज सकाळी बिबट्या आढळून आला होता. या बिबट्याला तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर  जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

 

 

MPC News Podcast 20 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिरे गावात बिबट्याला आढळून आला आहे. याबाबतची माहिती सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली.त्यानंतर आमची टीम पुढील काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली.त्यावेळी बिबट्या सुरुवातीला पत्राच्या शेड मध्ये होता.त्यानंतर तो तेथूनच दुसर्‍या शेडमध्ये लपून बसला.

 

 

त्यावर आम्ही चार ही बाजूने जाळी आणि योग्य नियोजन केल्यानंतर तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात यश आले आहे.तसेच त्याची तब्येत ठीक ( Pune News) असल्याचे सांगण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.