Pune News : अरे जाऊ दे, कावळ्याच्या शापानं गुरं कधी मरत नसतात : अजित पवारांचा निलेश राणेला टोला

एमपीसी न्यूज : निलेश राणे यांनी पुन्हा तुमच्या वर टीका केली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, आरे जाऊ दे कावळ्याच्या शापानं गुरं कधी मरत नसतात. हे तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्याच आणखी नाव घेऊन त्यांना काय महत्त्व द्यायचं, असा राणेला जोरदार टोला अजित पवारांनी पत्रकार परिषदेत लगावला.

पुण्यातील एल्गार परिषद पुन्हा वादात सापडली आहे. त्यावर पवार म्हणाले, त्यामध्ये एकाने जे विधान केले. ते अजिबात योग्य नाही. त्या संदर्भात आता गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस त्यांच काम करतील. घटनेप्रमाणे, कायद्या प्रमाणे संविधानाप्रमाणे जर चुकीचे काही बोलले असतील. तर त्याच्यावर कारवाई होईल. पण भाषण करणार्‍यांनी तारतम्य ठेवून भाषण करायच असत. तिथे अनेक मोठ मोठी लोक होती. त्या व्यासपीठावर न्यायाधीश म्हणून काम केलेली व्यक्ती होती.

त्यावेळी ते भाषण करीत असताना थांबवायला पाहिजे होतं. हे भाषण आपल्या देशाला योग्य नाही. आपल्या देशात अनेक समाजातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. यामुळे देशात तेढ आणि द्वेष निर्माण होईल असं त्यावेळी बोलायला पाहिजे होतंं, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.