Pune News : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डधारक दिव्यांग टिंकेश कौशिक यांनी उभारली आत्याधुनिक जिम

एमपीसी न्यूज – दिव्यांगतेवर मात करत भारत प्रेरणा अवॉर्ड पटकावणारे आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डधारक टिंकेश कौशिक यांनी पुण्यात आत्याधुनिक जिम उभारली आहे.

कौशिक हे झज्जर, हरियाणा येथील रहिवासी आहेत नऊ वर्षांचे असताना एका दुर्घटनेमुळे त्यांनी गुडघ्याखालचे दोन्ही पाय व डावा खांदा गमावला. अपंगत्वावर मात करत त्यांनी आपली फिटनेस कोच अशी ओळख निर्माण केली आहे. टिंकेश यांनी दिव्यांग लोकांसाठी सुसज्ज व आत्याधुनिक जिम उभारली आहे.

टिंकेश कौशिक यांच्या दुर्घटनेनंतर पहिल्या दोन वर्षांसाठी ते स्थिर होते. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना जयपूर फुट (कुत्रीम पाय) लागला ज्यामुळे त्यांनी स्वतःहून फिरण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. टिंकेश आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या उद्योगाबद्दल मोहित होऊन दोन वर्षांच्या कालावधीत व्यायाम आणि खेळातून त्यांनी 15 किलो वजन कमी केले.

टिंकेश 2018 मध्ये पुण्यात आले आणि योग शिक्षक आणि वेलनेस कोच स्मिता गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फिटनेस अँड न्यूट्रिशन कन्सल्टंट म्हणून प्रमाणपत्र मिळवले. टिंकेशने आपल्या मेन्टरच्या पाठिंब्याने पुण्यातील उंड्री – पिसोळी रोड येथे ‘माईलस्टोन – द फिटनेस क्लब’ आधुनिक उपकरणाने सुसज्ज जिम सुरू केली आहे. यासह फंक्शनल ट्रेनिंग योग आणि झुम्बा वर्गांसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

टिंकेश कौशिकने 25 नोव्हेंबर 2018 रोजी नेपाळच्या काठमांडू येथे भारत प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जगातील सर्वात जास्त उंचीच्या कॅनियन स्विंग साइट ‘द लास्ट रिसॉर्ट’मध्ये 160 मीटर उंचीवरून स्विंग बन्जी जम्प केली. या रेकाॅर्डसाठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. टिंकेशने अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि विविध संस्थांकडून त्यांना सन्मानित केले गेले आहे. अनेकांना प्रेरणा देणारे एक आदर्श आणि प्रेरक म्हणून त्यांना सन्मानित केले गेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.