Pune News : लायन्स क्लबचा ऑक्सिजन बँक उपक्रम

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 – डी 2 च्या वतीने ऑक्सिजन बँक या प्रकल्पाचे उद्घाटन प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. 100 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीनची ही बँक असणार आहे. लायन्स क्लबचे सभासद आणि गरजूंना नाममात्र शुल्कात हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यावेळी पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, प्रकल्प समन्वयक विजय सारडा, राज मुछाल, प्रकल्प प्रमुख जितेंद्र मेहता, बी.एल.जोशी, सुनिता चिटणीस, संतोष सोनावणे, सुनील जाधव, रवींद्र गोलर, पुनित कोठारी, मुरलीधर साठे, सुदाम मोरे, श्रेयस दीक्षित, ज्योतिबा उबाळे, सागर भोईटे, प्रीती दीक्षित, अनुराधा शास्त्री, विनिता गुंदेचा, वरुडे पाटील, अ‍ॅड जगताप, राजेंद्र टिळेकर, मृणाल बेलसरे आदी उपस्थित होते.

विजय सारडा म्हणाले, एकंदरीत 47 लाख रुपये किमतीच्या या 100 मशिन्स आहेत. ऑक्सिजन क्लब उपक्रमांतर्गत गरजूंना तसेच लायन्स क्लबच्या सभासदांना या मशीन्स देण्यात येणार आहेत. यापैकी 25 मशिन्स उपलब्ध झाल्या असून उर्वरित 75 मशीन्स लवकरच उपलब्ध होणार आहेत.

कित्येकदा रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यास येणाऱ्या अडचणी व त्यातून जीवावर बेतणारे प्रसंग घडले आहेत, या गोष्टी टाळण्यासाठी ऑक्सिजन बँक उपक्रमाचा हातभार लागणार आहे.

राज मुछाल म्हणाले, ऑक्सिजन बँक हा प्रकल्प अनेकांना जीवनदायी ठरणार आहे या प्रकल्पामुळे लायन्सची जनमानसातील प्रतिमा उंचावेल. या प्रकल्पासोबतच रोटी बँकेचे देखील भरीव कार्य होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.