Pune News लॉकडाऊनमुळे नैराश्य आलंय, मानसिक ताण जाणवतोय ? मोकळे व्हा!

पुणे स्मार्ट सिटीने नैराश्य, चिंता, ताण - तणाव व इतर मानसिक त्रास जाणवत असल्यास मोफत समुपदेशन सुरू केले आहे. नागरिकांना नैराश्य, ताण अशी समस्या जाणवत असल्यास कॉल करून मन मोकळे करता येणार आहे.

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णाचा वाढता आलेख पाहता दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तूटावी या देशात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊनमुळे संसर्ग रोखण्यासाठी किती यश आले हा वेगळा विषय असला तरी लॉकडाऊनमध्ये अधिकांश लोकांना नैराश्य, चिंता, ताण – तणाव व इतर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

पुणे स्मार्ट सिटीने नैराश्य, चिंता, ताण – तणाव व इतर मानसिक त्रास जाणवत असल्यास मोफत समुपदेशन सुरू केले आहे. नागरिकांना नैराश्य, ताण अशी समस्या जाणवत असल्यास कॉल करून मन मोकळे करता येणार आहे. चोवीस तास सातही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

पुणे स्मार्ट सिटीने मोफत समुदेशन हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांना मोबाईल नंबर व संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नंबरवर कॉल करून मोफत सल्ला घेता येईल तसेच संकेतस्थळावरून चॅट अथवा फोन करून सल्ला घेता येणार आहे.

मोफत समुपदेशन हेल्पलाईन नंबर 7303250515 या क्रमांकावर कॉल करून मोफत सल्ला घेता येईल. तसेच Pune.epsyclinic.com या संकेतस्थळाला भेट देता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.