Pune News : लोहगाव विमानतळ एप्रिल-मे मध्ये 14 दिवस बंद राहणार

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील लोहगाव विमानतळ येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 14  दिवसांसाठी बंद राहणार आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या पुनर्रचनेसाठी हे विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे.

लोहगाव विमानतळ प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. लोहगाव विमानतळाच्या पुनर्रचनेचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या कमला अखेर 26  ऑक्टोबरला मुहूर्त मिळाला. तेव्हापासून हे काम सुरु करण्यात आले. साधारण वर्षभर हे काम सुरु राहणार आहे.

का कामासाठी आता एप्रिल आणि मे महिन्यातील 14 दिवसांसाठी विमानतळावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.