Pune News : मधुरा चौकसकर आणि रिया बोगावतच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज –   मधुरा चौकसकर आणि रिया बोगावत यांच्या (Pune News) अरंगेत्रमने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. भरतनाट्यम व पदलालित्य यांचा अनोखा संगम प्रजासत्ताक दिनी अरंगेत्रम मध्ये पहायला मिळाला.

गुरु सुचित्रा दाते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमात दोघींनी भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटा सादर केल्या.

कार्यक्रमात रिया आणि मधुरा हिने गंभीरनातई रागावर आधारित मल्लरी, नातई महा गणपतीम, यमन कल्याणी रागावर आधारित नवकार, खंडा तालावर आधारित अलरीप्पू, मध्यमावती रागावर आधारित ब्रम्ह संधी, हमसानंदी रागावर आधारीत जतिस्वरम, रागमालिकावर आधारित शब्दम, रागेश्रीवर आधारित वरणम, भैरवी शंकर श्रीगिरी,  शेंजूरुत्ती विषमकारा कन्नन, भजनी तालावर आधारित खेळ मांडीयेला, शिवरंजनी तिल्लाना, मध्यमावती मंगलमया प्रकाराचे सादरीकरण केले. ऊर्जाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्य यांचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला.

Loni : 36 वर्षानंतर पुन्हा भरला इयत्ता दहावीचा वर्ग

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नृत्य प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल फॉर डान्सच्या वतीने (Pune News) या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. मिनल जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन गायत्री चौकसकर यांनी केले.

या कार्यक्रमात नट्टूवंगमची साथ सूचित्रा दाते व श्रुती टेकावडे, मृदंगमची साथ पी आर चंद्रन, गायनाची साथ निथी नायर, बासुरीची साथ सुनील अवचट, व्हायोलिनची साथ बालसुब्रमण्यम सर्मा यांनी दिली. वेशभूषा के. मोहन आणि लक्ष्मी मोहन, लाइट-साऊण्ड हर्षवर्धन केतकर, कार्ड डिझायनर शिबानी चौधरी, प्रात्याक्षिक इशा जोगळेकर, समृद्धी साका आणि तन्मयी शितोळे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.