Pune News : 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात महाविकास आघाडीची उद्या बैठक

एमपीसी न्यूज – 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात बुधवारी (दि. 14) काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आज पत्रकारांना दिली.

प्रशांत जगताप म्हणाले, या गावांच्या विकास आराखडा तयार करताना विक्रम कुमार हे पीएमआरडीए प्रमुख होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विकास आराखड्यासंदर्भात विनंती करणार आहोत. 3 वर्षे झाले या डीपीचे काहीही झाले नाही. 12 दिवसांत 23 गावांचा डीपी करणे घाईघाईने झालेला निर्णय आहे. सभासदांची दिशाभूल केली जात आहे. या डीपीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता जगताप यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी म्हणून राज्य शासनाकडे डीपी संदर्भात तक्रार करू. काही मंडळी न्यायालयात जातील, असा इशाराही त्यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांनी गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी देण्याची मागणी केली. त्यांनी गावांचा समावेश केल्यावर साधे 900 कोटी दिले नाहीत.

पृथ्वीराज सुतार म्हणाले, पीएमआरडीएने गावांच्या विकास आराखडाचे 90 टक्के काम केले. त्यांनी केलेल्या आराखड्याला मान्यता द्यावी. हा राजकारण करण्याचा विषय नाही. 23 गावांचा विकास आराखडा होऊ द्या. 11 गावे आणि येवलेवाडी विकास आराखड्याचे काय झाले, ते सांगण्याची नव्याने गरज नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.