Pune News : महाराष्ट्र विद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारपासून

एमपीसी न्यूज – पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारी (दि.16, मार्च) आयोजित करण्यात आला आहे.

सहकारनगर येथील संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी सकाळी 11.30 वाजता संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कुलगुरू दादासाहेब केतकर, गुरुवर्य डॉ. अण्णासाहेब खैर व डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या प्रेरणेने 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्र विद्यालयाची स्थापना झाली होती. यंदा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कोरोनाचे सर्व नियम पाळून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.