Pune News : मंडईतील भाजीपाला व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज : भाजीपाला, फळ, पान, पूजा साहित्य व भुसार विक्रेत्यांना पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. या सर्वांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन वंचित बहुजन आघीडीचे (Vanchit Bahujan Aaghadi)  नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar)  यांनी आज, शनिवारी दिले.

मंडई येथील व्यावसायिकांवर काही दिवसापासून स्थलांतराची ( transfer)  टांगती तलवार आहे. आज शनिवारी सकाळी अकरा वाजता प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai)  येथे भेट देऊन या व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

ॲड.आंबेडकर म्हणाले, मी मेट्रोचा आराखडा (Metro Leyout)पाहिला असून, त्यानुसार कार्यवाही करावी. येथील व्यापारी जागा द्यायला तयार आहेत परंतु, पहिले पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे आणि ती बरोबर आहे.

मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, असा विश्वास त्यांनी येथील स्थानिक व्यावसायिकांना दिला.

यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी त्यांच्या समस्या आंबेडकर यांना सांगितल्या. त्यामध्ये आहे त्या जागी पुनर्वसन करावे, भाडेवाढ रद्द करावी, गाळे दुरुस्ती करावी, रोज स्वछता व साफसफाई करावी, करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्या त्यांनी आंबेडकर यांच्यासमोर मांडल्या. .

यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची, वंचित आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, शहराध्यक्ष मूनवर कुरेशी, नितीन शेलार,भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे तसेच मंडई येथील सर्व व्यावसायिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.