Pune News : लॉकडाऊन पूर्वी राज्यातील कामगारांचे वेतन त्वरित देणे बंधनकारक करा : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन त्वरित देणे बंधनकारक करावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, राज्यातील विविध उद्योगात कायम, कंत्राटी, हंगामी, कामगार, मजूर लाखोंच्या संख्येत आहेत. वेतनाची तारीख त्यास शासकीय सुट्ट्या जोडून आल्या असून या सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन तातडीने व्हावे. राज्यात मोठ्या प्रमाणात कंत्राटी व हंगामी पद्धतीने कामगार काम करतात त्यांचा विचार शासनाने करणे महत्त्वाचे आहे. विविध आस्थापना कडून वेतन न मिळाल्यास कंत्राटदार त्यांच्या कडील कार्यरत कामगारांना वेतन देत नाही हा अनुभव आहे, त्यामुळे यांचे त्वरित वेतन होणं गरजेचं आहे.

कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करु नये. राज्यातील कोणत्याही आस्थापनात काम करणाऱ्या कामगारांना वेतना अभावी गैरसोय होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावी, अशी मागणी संघाने पत्राद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.