Pune News : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव

एमपीसी न्यूज – अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने यावर्षी अक्षय्य तृतीया मंदिरात साजरी केली जात आहे.

दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असुन रोडवरुनच भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव होणार आहे. यावेळी दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.