Pune News : मंथन फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय सूर्यनमस्कार शिबिराचा उपक्रम

एमपीसी न्यूज – रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन मंथन फाउंडेशन, निरामय योग प्रसार केंद्र, पुणे व यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यामध्ये योग शिक्षक पदविका विद्यार्थी यांनी विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन केले होते.

_MPC_DIR_MPU_II

कार्यक्रमात 500 लोकांनी सहभाग नोंदविला व 5000 सूर्यनमस्कार घालण्यात आले. शिबिरामध्ये झूम मीटिंग, Google meet व प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. मंथन फाउंडेशन तर्फे पुणे, उस्मानाबाद, परभणी, कोल्हापूर, मुंबई व महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यातून सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर, योगशिक्षक पदविकेच्या केंद्रप्रमुख विद्या आहेरकर, राम काकडे, डॉ. सतीश बापट, डॉ. नीता पद्मावत, डॉ. मीनाक्षी रेड्डी, डॉ. अर्चना मुदखेडकर, सविता स्वामी, रविना कुलकर्णी, डॉ. धीरज देशपांडे, आणि डॉ. गिरीश वेलणकर व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच विद्यापीठातून रश्मी रानडे, बाळू मोकाळ, शुभम भोंगळे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.