Pune News : मराठा क्रांती मोर्चा 8 डिसेंबरला विधान भवनावर धडक मोर्चा

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. मात्र अद्यापही कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर आपपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार आहे. असा निर्णय मराठा क्रांती राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत झाला आहे. अशी माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले की, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे विद्यार्थी वर्गांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी चर्चा केल्यास, मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागेल.

राज्यातील मराठा समाजाचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्याचे महत्त्वाचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या सर्व प्रमुख नेते मंडळीनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागु शकतो. अशी भूमिका राजेंद्र कोंढरे यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.