Pune News : पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान गुरूवारी मराठा संघर्ष यात्रा

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान गुरूवारी मराठा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. चार फेब्रुवारी रोजी पुण्यातून हा मोर्चा निघणार असून पाच फेब्रुवारीला जालना येथे पोहचेल.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी याबाबत माहिती देण्यात आली. पाच फेब्रुवारीला मराठा आरक्षणाबाबत न्यालयात सुनावणी होणार आहे. त्या पाश्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून यात्रेला सुरवात होईल. शिवाजीनगरमार्गे, येरवडा, नगर रस्ता, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, सुपा, नगरमार्गे बीड येथे मुक्काम करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (ता.5) सकाळी दहा वाजता बीड येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होइल. बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील अंबड तालुकयातील साष्ट पिंपळगाव येथील मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे.

साष्ट पिंपळगावातील मराठ्यांनी ठिया आंदोलनातून संघर्ष सुरु केला आहे. त्यांना पाठिंबा देवून या लढ्याला बळकटी देण्यासाठी मराठा समाजाने संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.