Pune News : संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मार्केटयार्ड राहणार बंद !

एमपीसी न्यूज : देशव्यापी भारत बंदमध्ये राज्यातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मार्केटयार्ड उद्या (मंगळवार दि.8) पूर्णत: बंद राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे पुणे जिल्हा व अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल, फळ-भाजीपाला विक्रीकरीता आणू नये, असे आवाहन पुणे कृषी बाजार समितीचे प्रशासक मधुकर गरड यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी मार्केटयार्ड येथे शेतमाल,फळ, पालेभाज्या विक्रीसाठी आणत असतात, परंतु बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सर्व व्यवहार दिवसभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार पहाटे (दि.9) पासून सर्व व्यवहार सुरळीत पूर्ववत होतील, असेही समितीकडून कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.