Pune News : पतीचा मृत्यूनंतर विवाहितेला घराबाहेर काढले, सासू, सासरे, दिराविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरोनाने पतीचे निधन झाल्यानंतर विवाहितेचा छळ केला. घरातील सर्व वस्तूंवर ताबा घेतल्यानंतर तिला घरातून बेदखल केल्याप्रकरणी सासू-सासरे, दिरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार. 

सासू आशा गुप्ता, सासरे गोपालकृष्ण गुप्ता, दिर निशांत गुप्ता आणि प्रशांत गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2018 पासून फिर्यादीचा छळ सुरु होता. आई-वडिलांनी लग्नात सासरच्या लोकांचा मानपान केला नाही. तसेच लग्नात झालेल्या रिसेप्शनचा खर्चाची रक्कम मागितल्याचा राग मनात धरून आरोपींनी वेळोवेळी फिर्यादीचा छळ केला. याशिवाय फिर्यादीला नोकरी करण्यास मनाई करणे, आडनाव बदलण्यासाठी दबाव टाकणे, आई-वडिलांसोबत फोनवर बोलू न देणे अशा मानसिक छळ केला आहे.

काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यानंतर फिर्यादीच्या पतीचे मोबाईल, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आधार कार्ड, बँक डिटेल्स यासारख्या वस्तू काढून घेतल्या आणि फिर्यादीला सासरी प्रवेश न देता घरातून बेदखल केले आहे. फिर्यादी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.