Pune News : कात्रज परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, दहा ते बारा लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कात्रज जवळील गुजरवाडी भागात एका फर्निचरच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत अंदाजे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

_MPC_DIR_MPU_II

गुजरवाडी येथील रस्त्यावर असणारे ओम एंटरप्राइजेस आणि इंटेरियरच्या दुकानाला आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आगीत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी दुकानाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अंदाजे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.