Pune News : शास्त्रीय संगीताचे अर्ध्वयू पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

एमपीसी न्यूज – भारतीय शास्त्रीय संगीताचे अर्ध्वयू पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान (89) यांचे आज दुपारी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झाले‌.

नम्रता गुप्ता-खान पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांनी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी रविवारी दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. सकाळी त्यांची प्रकृती ठीक होती, मात्र दुपारी अचानक त्यांची प्राणज्योत मालवली.

दीर्घकाळापासून ते आजारी असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी घरी 24 तास नर्सची नियुक्ती करण्यात आली होती. उस्ताद खान यांना 2019 मध्ये ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराची डाव्या बाजूला अर्धांगवायूचा त्रास झाला होता.

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना 1991 मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये पद्मभूषण तर 2018 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये त्यांना भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज पुरस्कार मानल्या जाणाऱ्या संगीत नाटक ॲकॅडमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.