Pune News : ‘देव सर्वांना विपुल सुबुद्धी देवो’ – मंदिरे खुली करण्याबाबत गोविंदगिरी महाराजांचे सूचक वक्तव्य

एमपीसी न्यूज : राज्यात अनेक गोष्टी सुरु झाल्यात पण अजून मंदिरं खुली झालेली नाहीत, त्या संबंधीच्या प्रश्नावर ‘देव सर्वांना विपुल सुबुद्धी देवो’ असे सूचक वक्तव्य रामजन्मभूमी मंदिर निर्मिती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य किशोरजी व्यास ऊर्फ गोविंदगिरी महाराज यांनी दिली.

एका कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

_MPC_DIR_MPU_II

आचार्य गोविंदगिरी महाराज पुढे म्हणाले, अयोध्येत 2024 च्या आत भव्य राम मंदिर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या कोषामध्ये 78 कोटी रुपये आहेत. त्यातले 24 कोटी रुपये आम्ही लार्सन अँड टुब्रोला देणार आहोत. लोकवर्गणीतून कोषामध्ये जमा असलेली रक्कम सातत्याने वाढत आहे.

आम्ही आणखी योजना राबवणार आहोत. 15 जानेवारी ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत देशातल्या 11 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्टय आहे. शंभर आणि दहा रुपये कुपनच्या माध्यमातून निधी संकलनाचे कार्य करण्यात येईल.

2024 च्या आत भव्य राम मंदिर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण घाई करुन मंदिराच्या दर्जामध्ये फरक पडू देणार नाही. सुरक्षित, एक हजार वर्षापर्यंत टिकणारे मंदिर उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तज्ज्ञ, आर्किटेक्टकडून आराखडे मागवणार आहोत. त्या पायावर मंदिर उभे राहिल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.