Pune News : महापौरांनी पुणेकरांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करु नये – माजी आमदार मोहन जोशी

एमपीसीन्यूज : केंद्र सरकारकडून अडीच लाख कोरोना लसीच्या डोसचा पुरवठा थेट पुण्यासाठी करण्यात आला हा महापौरांचा दावा चुकीचा असल्याचे उघड झाले आहे. जबाबदार पदावरील व्यक्तीने कोरोना साथीची परिस्थिती गांभीर्याने हाताळावी, कोरोना लसीच्या डोस संदर्भात पुणेकरांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करु नये, असे आवाहन माजी आमदार, प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले आहे.

केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन देण्यात आली आहे, असे ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आणि तातडीने लस पुरविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभारही मानले.

_MPC_DIR_MPU_II

महापौरांचा हा प्रयत्न उगाचच श्रेय घेण्याचा आहे हे नंतर आरोग्य विभागाकडून माहिती घेता उघड झाले. केंद्र सरकारने कोरोना लसीचे चार लाख डोस राज्यासाठी पाठविले. त्यातील एक लाख डोस पुणे जिल्ह्यासाठी मिळालेले आहेत.

त्यापैकी पन्नास हजार डोस ग्रामीण भागाला, वीस हजार डोस पिंपरी-चिंचवड भागांसाठी आणि तीस हजार डोस पुणे शहरासाठी आहेत. ही वस्तुस्थिती असताना महापौर पदावरील व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन डोससंबंधी चुकीची आकडेवारी देऊन पुणेकरांना खोटी आकडेवारी देऊन दिशाभूल करणे खेदजनक आहे.

शहरातील सध्याची कोरोना साथीची गंभीर स्थिती लक्षात घेऊन महापौरांनी अधिकाधिक लस मिळविणे, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आदी आरोग्ययंत्रणा सक्षम करणे गरजेचे असताना ते न करता घाईघाईने चुकीची आकडेवारी देऊन श्रेय घेण्याचा व्यर्थ खटाटोप केला. वास्तविक लसीकरणाच्या वेग वाढायला हवा, सहजपणे लस उपलब्ध व्हावी, लसीकरणाची केंद्र बंद राहू नयेत याकडे महापौरांनी लक्ष द्यायला हवे, असे जोशी यांनी पत्रकात म्हट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.