Pune News : 18वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : एकूण 19 प्रकारात 443 सायकलपटूंचा लागणार कस

एमपीसी न्यूज : सायकलिंग असोशिएशन ऑफ इंडियाच्या (सीएफआय) मान्ययतेने व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सीएएम) होणाऱ्या 18 व्या राष्ट्रीय’ एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी विक्रमी 26 संलग्न राज्य व मंडळांचे 443 सायकलपटूंच्या प्रवेशिका निश्चित झाल्या आहेत.

पुणे येथिल आळंदी येथे शुक्रवारपासून सुरू होणारी स्पर्धा चार गटात होेत आहेत. स्पर्धा एलिट पुरूष-महिला, ज्युनियर मुले-मुली, सब-ज्युनियर मुले-मुली व युथ मुला-मुलींमध्ये चुरस होणार आहे.
एकूण 19 सायकल क्रीडा प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत टाईम ट्रायल, क्रॉसकंट्री मास स्टर्ट, डाऊन हिल आणि मिक्स टाम रिले प्रकारांचा समावेश आहे.

सीएएमच्या आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप जाधव म्हणाले, यावर्षी ह्या स्पर्धेत खूपच चुरस असणार आहे. या स्पर्धेसाठी आपले लक्ष साध्य करण्यासाठी आठ संघांचे सुमारे 150 सायकलपटू स्पर्धेच्या ठिकाणी ट्रायल व ट्रॅकची ओळख होण्याच्या दृष्यीने सरावासाठी दाखल झाले आहेत.आळंदी येथिल स्पर्धेच्या ठिकाणी तामिलनाडू, तेलंगणा, राजस्थान, उत्तराखंड, मध्यप्रदेश, दिल्ली, कर्नाटक संघांसह आयोजक महाराष्ट्र संघांचे खेळाडू मुक्कामास दाखल होेऊन सराव करीत आहेत.

13 व्या शतकात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी येथिल रमणीय स्थळी ४.७ किलो मीटरचा ट्रॅक करण्यात आला आहे. यावर्षी महत्वाची बाब म्हणजे, या स्पर्धेसाठी मेघालय, अरूणाचल व गोवा या राज्यांनी आपल्या प्रवेशिका नोंदविल्या आहेत. जाधव पुढे म्हणाले, पर्यंत ९ वेळा राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. 2014 ते 2018 दरम्यात सलग 5 वर्ष या स्पर्धेचे आयोजन केले हाते. गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेत स्पर्धेकांची संख्या वाढत आहे.

2014 मध्ये 185 स्पर्धेक हाते. 2018 मध्ये आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेत 343 स्पर्धेक होते. यावर्षी या स्पर्धेसाठी विक्रमी 400 च्या वर स्पर्धेकांनी प्रवेशिका निश्चित केल्या आहेत. गतवर्षी कर्नाटक येथिल गडाग येथे झालेल्या स्पर्धेतील विजेते कर्नाटक व उपविजेते महाराष्ट्र संघांतील सायकलपटूंमध्ये यावर्षी सुध्दा अटीतटीच्या लढतींचा थरार पहायला मिळणार आहे. सहभागी झालेल्या संघांमध्ये राजस्थानचा 44सायकलपटूंचा (29 पुरूष-मुले व 15महिला-मुली) संघ सहभागी झाला आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्र 37 व केरळ 34 खेळाडूंचा संघ आहे.

सदरहू एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा तिन्ही दिवस सकाळी 9 तर स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (29 ऑक्टोबर ) सकाळी 8 वाजता होेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.