Pune crime News : लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी करणा-याला ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी करणा-यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी औंध येथील कस्तुरबा वसाहत येथे घडली.

याप्रकरणी आरोपी ऋषभ उर्फ गुड्डया सुनिल गायकवाड (वय 19) अमीर अल्ल्लाउद्दीन शेख (वय 23) अक्षय अर्जुन अडागळे (वय 23) संकेत उर्फ अभिषेक अरूण आवळे (वय 19) (सर्व रा.कस्तुरबा वसाहत, औंध, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

दुर्गा गायकवाड (वय 39, रा. इंदिरा वसाहत, औंध, पुणे ) यांनी याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी यांनी लहान मुलांच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून आकाश नागनाथ गायकवाड (वय 24, रा.इंदिरा वसाहत, औध, पुणे) याला कोयत्याने डोक्यात, हातावर व पाठीत वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.