Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सी-मेट यांच्यात सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सेन्टर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी (सी-मेट) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आला. या करारानुसार विद्यार्थी व प्राध्यापकांचे संशोधन कार्यक्षेत्र वाढणार आहे.

या सामंजस्य करारावर 6 ऑगस्ट रोजी स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. संजीव सोनवणे, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सचे संचालक डॉ. सुरेश गोसावी, रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. अविनाश कुंभार, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, प्रा. दिनेश अंबळनेरकर, सी-मेटचे संचालक भारत काळे, कुलसचिव सुनीत राणे तसेच समन्वयक आदी यावेळी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व  सी-मेट हे मागील 25 वर्षांपासून एकत्र काम करत आहे. या करारामुळे याला अधिक मूर्त रूप येण्यास मदत झाली आहे. या कराराच्या माध्यमातून समान कार्यक्षेत्रात एकत्रित संशोधन करणे शक्य होणार आहे. तसेच अध्यापन, अध्ययन, संशोधनासाठी लागणारे साहित्य आदींची देवाण घेवाण होणार आहे. स्कूल ऑफ फिजिक्स, स्कूल ऑफ केमिस्ट्री, स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि अन्य संबंधित विभागांतील विद्यार्थ्यांना यामुळे अधिक सखोल अभ्यास करण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.