Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी ‘पढेगा भारत’ चा सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ संबंधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘पढेगा भारत’ या संस्थेशी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार केला आहे.

‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मधील जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले अभ्यासक्रम रोजगाराभिमुख व ज्ञानवृद्धी करणारे असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित लाभ होईल, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी या वेळी सांगितले.

सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ब्लॉकचेन, आयडिया लॅब आणि सेंटर ऑफ फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड इंटरप्रिनरशिप (C.F.T.E ) हे या अभ्यासक्रमाचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध कोर्सेस इंडस्ट्री एक्सपर्ट ग्लोबल फॅकल्टीज कडून ऑनलाईन पद्धतीने शिकविले जाणार आहेत. पदवीपूर्व, पदवीप्राप्त, पदव्युत्तर आणि प्रोफेशनलसाठी तांत्रिक व अतांत्रिक असे 38 कोर्सेस कमी व अधिक कालावधीचे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने शिकवले जाणार आहेत.

आधुनिक आर्थिक तंत्रज्ञानाचा वापर जागतीक बँकिंग व आर्थिक गुंतवणूक क्षेत्रात वाढल्याने त्याच्याशी सुसंगत असलेला ‘सेंटर ऑफ फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड इंटरप्रिनरशिप’ या अभ्यासक्रमाअंतर्गत अनेक कोर्सेस विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येतील.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित कमी व अधिक कालावधीचे कोर्सेस आयडिया लॅबद्वारे ऑनलाईन शिकविले जाणार आहेत.

सदर सामंजस्य करारप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिनेट सदस्य संतोष ढोरे, उपकुलगुरू श्री.उम्ब्रानी, इनोवेशन संचालिका अपूर्वा पालकर, रजिस्टरार डॉ. प्रफुल्ल पवार आणि प्रोफेसर आदित्य अभ्यंकर तसेच ‘पढेगा भारत’ च्या वतीने माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, चेअरमन-वेणू साबळे, कार्यकारी संचालक – सम्यक साबळे व ओंकार कस्पटे आदी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.