Pune News : ‘मिस वर्ल्ड’ युक्ता मुखी हिचे सोमवारी ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान

एमपीसी न्यूज – मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित श्रीमती मालतीबाई सराफ स्मृती व्याख्यानमालेत ‘मिस वर्ल्ड’ युक्ता मुखी हिच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या सोमवारी (दि.23) सायंकाळी 5.45 वाजता ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर युक्ता मुखी बोलणार आहे. 

झूम मीटवर, तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या फेसबुक पेजवर हे व्याख्यान प्रसारित होणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://us02web.zoom.us/j/7563662626?pwd=K3NxTExJN2ovQXZuanRWaVl4aWdBZz09 या झुम लिंकवर (आयडी : 7563662626  पासवर्ड : आरव्हीएस11) जावे किंवा https://www.facbook.com/MaViPa.pune या फेसबुक लिंकवर सहभागी व्हावे, अशी माहिती विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी दिली.

युक्ता मुखी हिने 1999 साली मिस वर्ल्ड किताब पटकाविला. त्यानंतर तिने विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. एचआयव्ही, स्तनांचा कर्करोग आणि थॅलेसीमियामुळे पीडित लोकांसाठी काम केले. तसेच सामाजिक वनीकरण, स्वच्छ व सुंदर परिसर आदी सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला.

युक्ता मुखीचा कल्याणीनगरमधील सलीम अली पक्षी अभयारण्य बचाव मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग होता. कमीतकमी संसाधनांचा व रसायनमुक्त वस्तूंचा वापर, शून्य कचरा निर्मिती, पुनर्वापर आदी संकल्पना राबविण्याचा प्रयत्न ती करत आहे. त्या अनुषंगाने युक्ता मुखी पर्यावरणपूरक जीवनशैली प्रत्यक्षात कशी अंगीकारावी, याविषयी बोलणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.