Pune News : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवावा – आमदार रोहित पवार

पुण्यातील एक कंपनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी उत्पादन करते. महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवावा यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवा यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले असून महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणे अक्षम्य चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातील एक कंपनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी उत्पादन करते. महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवावा यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

याप्रकरणी शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्या असून महाराजांचे नाव बिडी वरून हाटवले जावे अशी मागणी केली जात आहे.

याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले असून त्यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबत वक्तव्य केलं आहे.

रोहित पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करत आहे. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे.

लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा’ अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडीला दिलेले नाव हटविण्यासाठी पुणे, चंद्रपूर, हिंगोली, वसमत, सोलापूर, सातारा, जालना, नाशिक, नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.