Pune News : कोरोनाच्या कॉलर ट्युनबाबत आमदार रोहित पवार यांनी मागविले मते

महाराष्ट्रात हिंदीत कॉलर ट्यून हवीच कशाला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एमपीसी न्यूज – फोन लावल्या बरोबर सुरू होत असलेल्या कोरोनाच्या कॉलर ट्यूनबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लोकांची मते मागविली आहेत.

सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या रोहित पवार यांनी ट्विट करून कॉलर ट्यूनबाबत नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यापैकी कितीजणांना करोनाची कॉलर ट्यून ऐच्छिक करायला हवी असं वाटतं?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

त्यांच्या या प्रश्नाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या कॉलर ट्यूनचा वैताग आला आहे. फोन लावल्यावर सातत्याने ही रिंगटोन ऐकायला मिळते. समोरच्याला फोन लागला की नाही, काहीही कळत नाही.

महाराष्ट्रात हिंदीत कॉलर ट्यून हवीच कशाला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोना संदर्भात सातत्याने नकारात्मक जास्त चर्चा होत आहे. त्यापेक्षा सकारात्मक चर्चाही हवी आहे. त्यामुळे ही रिंगटोन काढून टाकण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.