Pune News: आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण

यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सभागृह नेते धीरज घाटे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्यासह नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

एमपीसी न्यूज – वडगावशेरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये टिंगरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती आमदार टिंगरे यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.

टिंगरे यांची प्रकृती सध्या ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांत टिंगरे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यानंतर तातडीने चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


दरम्यान, मागील 5 महिन्यांत सर्वसामान्य नागरिकांबरोबरच पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनाही मोठ्याप्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांची मोठ्याप्रमाणात धावपळ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मदत करण्यासाठी ते पुढाकार घेत असतात. त्यामधूनच या नगरसेवकांना कोरोनाची लागण होत आहे.

यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सभागृह नेते धीरज घाटे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्यासह नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी वेळीच उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.