Pune News : एकाच ठिकाणी एम.एन.जी.एल व समान पाणीपुरवठ्याची लाईन आणि L&T च्या कामावर मनपाचे नियंत्रण नाही – दीपाली धुमाळ 

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी समान पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. हे काम करताना शहरातील अनेक मुख्य रस्ते खोदून मोठया लाईन टाकल्या जात आहेत. तदनंतर हे खड्डे बुजविण्याचे काम अर्धवट केले जात आहे. तसेच एम.एन.जी.एल च्या माध्यमातून देखील खोदाई करून लाईन टाकणचे काम केले जात आहे. त्यावर मनपाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे.

एखादा चांगल्या पद्धतीचा डांबरीकरण केलेला रस्ता असेल व त्यारस्त्यावर जर पाईपलाईन ची खोदाई करीत असेल तर त्या लाईन टाकल्यानंतर सदर खोदाई केलेल्या रस्त्याची दुरूस्ती ही त्वरीत कली जात नाही तर डाबंराच्या रस्त्यावर सिमेंट काँक्रीट ने डागडुजी केली जाते हे चुकिचे आहे. चांगला रस्ता विद्रूप केला जातो याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नसते. काही ठिकाणी एम.एन.जी.एल च्या माध्यमातून खोदाई केल्यावर त्यामधून समान पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकले जात असून पाणीपुरवठा विभागाकडून याचे बिल घेतले जात आहे. जागेवर माहिती विचारली असता कोणालाही कोणाचे काम चालू आहे याची माहिती दिली जात नाही.

वास्तविक पाणीपुरवठयाचे पाईप जवळून एम.एन.जी.एल च्या लाईन टाकणे धोकादायक आहे. भविष्यात देखभाल दुरूस्तीची कामे करताना मोठी अडचण निर्माण होवू शकते. समान पाणीपुरवठा योजनेचे काम जागेवर चालू असताना पुणे महापालिकेचे अधिकारी यांनी समक्ष कामाची पाहणी करणे बंधनकारक असताना मनपाचे अधिकारी उपस्थित नसतात, संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता कोणतीही माहिती नसते. कोट्यावधींचा खर्च मनपा करीत असून अधिकारी कामाची पाहणी देखील करत नाहीत ही बाब खेदजनक आहे.

दीपाली धुमाळ म्हणाल्या, अनेक ठिकाणी पाण्याचे मीटर बसविण्याचा प्रकार चालू असून नागरिकांना हे मीटर बसविणे बंधनकारक आहे असे सांगितले जात आहे. अजून पाण्याचे लाईनचे नेटवर्क पूर्ण नाही, पाणी कमी दाबाने अथवा अचानक येणे बंद झाल्यास तो अडथळा शोधायला महिन्याचा कालावधी घालविला जातो. सर्वप्रथम पाण्याच्या लाईनचे नेटवर्कचे नकाशे इंत्यभूत माहितीसह उपलब्ध होणेसाठी मागील 5 वर्षात पाण्याच्या लाईन टाकणेचे काम ज्या ज्या अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली झाले त्यांना या कामाची माहिती एकत्रित करणेचे आदेश दयावेत. मागील 5 वर्षांच्या कामाच्या माहितीसह याकामी संबंधित सर्व कनिष्ट अभियंता, उप अभियंता यांची एकत्रित बैठक खातेप्रमुखांच्या उपस्थितीत बोलवावी. अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या आहेत त्या अर्धवट अवस्थेत सोडलेल्या आहेत.

तरी समान पाणी पुरवठा योजनेशी संबंधित सर्व अधिकारी यांना कामाच्या ठिकाणी समक्ष जागापाहणी करणेचे आदेश देण्यात यावेत. यावेळी आम्ही देखील समक्ष कामाची पाहणी करणेस येणार असल्याने आम्हास त्याबाबतची वेळ लेखी स्वरूपात कळविण्यात यावी.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.