Pune News : पुण्यात मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक : राज ठाकरे यांची घोषणा

पथकात पन्नास प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा समावेश; नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पथक करणार मदतकार्य

एमपीसी न्यूज – नाशिक दौऱ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधत आहेत. या दौऱ्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात मनसेचं आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीसाठी तयार असणार आहे.

या आपत्ती व्यवस्थापन पथकात 50 मुला – मुलींचा समावेश असेल. शहरातील पूरस्थिती, इमारता दुर्घटना तसेच नैसर्गिक आपत्तीत मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार आहे. या पथकातील सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली. पुण्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी हे पथक तयार असणार आहे. 50 जणाचे हे पथक अडचणीत असलेल्या पुणेकरांच्या मदतीला धावून येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.