Pune News : अंत्यविधीला ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने मनसे गटनेत्याने फोडली महापालिका अधिकाऱ्याची गाडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अंत्यविधीसाठी थांबावे लागत आहे. मृतदेह नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळत नाही. त्याची प्रचिती आज वसंत मोरे यांनाही आली.

एमपीसी न्यूज – वारंवार मागणी करूनही अंत्यविधीला ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने अखेर सोमवारी संताप व्यक्त करीत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडली.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. महापालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांनाही गाडीत फिरायचा अधिकार नाही, असा इशाराही वसंत मोरे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अंत्यविधीसाठी थांबावे लागत आहे. मृतदेह नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळत नाही. त्याची प्रचिती आज वसंत मोरे यांनाही आली.

महापालिकेच्या व्हेईकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांची गाडी सोमवारी दुपारी फोडली. मोरे यांच्या जवळच्या नातेवाईकाचे रविवारी निधन झाले. त्यांनी ॲम्ब्युलन्स मिळण्यासाठी महापालिकेकाकडे वारंवार पाठपुरावा केला.

मात्र, ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उशीर झाला. एका नगरसेवकाची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकाचे काय, असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला.

नातेवाईकाचा मृत्यू झाल्यावर त्याला साधी ॲम्ब्युलन्स देऊ शकलो नाही, तर या नगरसेवक पदाचे काय करायचे, अशी विचारणाही मोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

यावेळी वसंत मोरे यांना आपले अश्रू आवरता आले नाही. अंत्यविधी करण्यासाठी मशीनचाच आग्रह का ? लाकडं आणि गौऱ्यावरही अंत्यविधी करा, अशी मागणीही मोरे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.