Pune News: भाजपच्या नगरसेवकांना मनसे नेते वसंत मोरे यांनी उपलब्ध करून दिले बेड्स

मी नावं घेणार नाही पण पुणे शहरात 100 नगरसेवक असलेल्या भाजपच्या तीन नगरसेवकांनी मला फोन केले होते आणि त्यांना बेड कुठे उपलब्ध आहेत याची माहिती देऊन ते उपलब्ध करून दिले.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी बेड्स उपलब्ध करून दिले.

मी नावं घेणार नाही पण पुणे शहरात 100 नगरसेवक असलेल्या भाजपच्या तीन नगरसेवकांनी मला फोन केले होते आणि त्यांना बेड कुठे उपलब्ध आहेत याची माहिती देऊन ते उपलब्ध करून दिले. ज्यांचा इथे महापौर आहे, त्यांच्या नगरसेवकांना बेड मिळू नयेत? असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मोरे यांच्या कार्याबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस सुरू आहे. पुणे शहरात कोरोनाचे 1 लाख 5 हजार 905 रुग्ण झाले आहेत. त्यामध्ये 86 हजार 940 रुगणांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या आजारामुळे 2 हजार 512 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पुणे शहरात 16 हजार 453 सक्रिय रुग्ण आहेत. एक – एक बेड मिळविण्यासाठी सर्वच नगरसेवकांना प्रयत्न करावे लागत आहे. वारंवार विनवणी करूनही हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

आता सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांना बेड मिळत नसतील तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना बेड कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यात कोरोनाचे एक लाखाच्यावर रुग्ण गेले आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री कधीही नगरसेवकांना बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.