Pune News: पुण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, वर्षभरात हरवले 29 हजार 500 मोबाईल सापडले अवघे 499

एमपीसी न्यूज :पूर्वी बसस्टॅन्डवर, प्रवासात लोकांचे दागिने, पाकिटे मारली जायची त्यामुळे नागरिकांना, महिला अंगावर दागिने घालून जात असतील तर त्यांना मंगळसूत्र चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे दागिने सांभाळा, पाकीट जपा असा इशारा दिला जात असे. आता मंगळसूत्र चोरट्यांबरोबरच मोबाईल चोरट्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर मोबाईल सांभाळा असे सांगण्याची वेळ आली आहे.

वर्षभरात तब्बल 29 हजार 516 मोबाइल चोरीलाशहरात सध्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झालेला दिसून येतो़ बसस्थानक, सांस्कृतिक कार्यक्रम, भाजी मंडई, राजकीय पक्षांची आंदोलने, कार्यक्रम, विवाह समारंभ, गर्दीचे रस्ते अशा ठिकाणाहून लोकांचे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे शहरात वर्षभरात तब्वर्षभरातबल 29 हजार 516 मोबाइल चोरीला गेले आहेत. त्याशिवाय रस्त्याने जाताना चोरट्यांनी जबरदस्तीने हातातील मोबाइल चोरून नेल्याच्या 90 घटना घडल्या असून त्याबाबत जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यातील  फक्त 499 मोबाईल सापडले आहेत.लॉस्ट अँड फाऊंड’ वर नागरिकांनी मोबाईल हरवल्याची नोंद.

पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर ‘लॉस्ट अँड फाऊंड’ वर नागरिकांनी मोबाईल हरवल्याची नोंद केली आहे. त्यातील बहुतांश मोबाईल हे लोकांच्या नकळत चोरलेले असतात. मात्र, पोलीस असे गुन्हे दाखल करण्याऐवजी लोकांना ‘लॉस्ट अँड फाऊंड’वर नोंद करायला सांगतात. लोकांनाही नवे सिमकार्ड घेण्यासाठी केवळ पोलीस तक्रारीची नोंद हवी असते. त्याचबरोबर तक्रार नोंदवून घेतली तरी पोलीस आपला मोबाइल शोधणार नाही, याचा नागरिकांना विश्वास असल्याने तेही वेबसाईटवर तक्रार करुन मोबाईल चोरी विसरुन जातात. अशा प्रकारे शहरात दररोज साधारण 65 मोबाइल चोरीला जात असतात. मात्र, त्यांची पोलिसांकडून हरविल्याची नोंद केली जाते. मात्र, ही चोरी असली तरी त्याचा तपास होत नाही.
परराज्यात मोबाईलची विक्रीगुन्हे शाखेने यावर्षी असे हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी ते ट्रेसिंगवर लावले. त्यात काही त्यांच्या मूळ मालकाकडे आढळून आले. तसेच काही मोबाईल राज्यातील इतर शहरात, तर बरेचसे परराज्यात ऍक्टिव्ह  असलेले आढळून आले.

पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांत चोरलेले मोबाइल हे अन्य राज्यांत गरिबांना विकले जातात. पोलिसांनी तो मोबाइल ट्रेस केला तरी, तो अनेकदा इतर राज्यात अॅक्टिव्ह झालेला दिसून येतो. तो जप्त करण्यासाठी पोलिसांकडे तेवढे मनुष्यबळ नसते, शिवाय 10 ते 15 हजारांचा मोबाईल मिळविण्यासाठी त्यापेक्षा अधिक खर्च येण्याची शक्यता असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.