Pune News : पुण्यात दोन दिवस मध्यम तर घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुण्यात येत्या दोन दिवसांत आकाश ढगाळ राहणार असून, मध्यम तर घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मागील 24 तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 22 आणि 23 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार तर, तुरळक ठिकाणी विजांचा गडगडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

पुण्यात आज (मंगळवार, दि.21) कमाल तापमान 29.7 अं. से. तर किमान तापमान 22.00 अं. से. नोंदवले गेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.