Pune News : मोडी लिपीचे अस्तित्व जतन व्हावे – सुरेंद्र पठारे

0

एमपीसी न्यूज – “छत्रपती शिवरायांकडून आपण अनेक गोष्टी शिकलो. परंतु, शिवराय एक अथांग असे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. त्यांचा अभ्यास करावा तितका कमीच आहे. त्यांच्याकडून शिकता येतील, अशा अनेक घटना, प्रसंग आजही मोडी लिपीच्या उदरात दडलेले आहेत. ते उलगडायचे असतील, तर मोडी लिपीचा अभ्यास करायला हवा. शिवरायांचे प्रेम लाभलेल्या मोडी लिपीचे जतन व्हावे,” असे प्रतिपादन ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391व्या जयंतीनिमित्त सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडी-चंदननगर येथे शिवरायांची भव्य 40 फुटी मोदी लिपीतील रांगोळी श्रुती पठारे यांनी साकारली. तसेच, शाहीर गंगाधर रासगे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती युवा धावपटू अवंतिका नराळे, महाराष्ट्रची लावण्यवती फेम नृत्यांगणा पूजा शेडे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता युवा खेळाडू सिद्धेश चौधरी आणि मोडी लिपीची अभ्यासक श्रुती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, संजीला पठारे, महेंद्र पठारे आदी उपस्थित होते.

सुरेंद्र पठारे म्हणाले, “शिवरायांची जयंती साजरी करणे हा केवळ एखादा उत्सव नसून, शिवरायांकडून प्रेरणा घेण्याचा, त्यांच्या शिकवणीची पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून देण्याचा दिवस असतो. शिवरायांनी जनहितार्थ आणि कल्याणार्थ अवलंबलेल्या मार्गांवरून आपण मार्गक्रमण करत आहोत की नाही हे तपासण्याचाही एक दिवस आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment