_MPC_DIR_MPU_III

Pune News : कोंढव्यातील टोळीवर मोकाची कारवाई; पोलीस आयुक्तांकडून तिसरी मोकानुसार कारवाई

एमपीसी न्यूज – खून करुन परिसरात वर्चस्व निर्माण करणा-या कोंढव्यातील सराईत टोळीवर मोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे 11 गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

आकाश लाला म्हस्के (टोळीप्रमुख वय 24 ) , ज्ञानेश्वर बालाजी लंगडे (वय 19) , संकेत प्रकाश आल्हाट (वय 24), चंद्रभागा लाला म्हस्के (वय 42), मंदा संजय जाधव (वय 28 सर्व रा. महमंदवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणा-या टोळीविरुद्ध मोकानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तालयात सादर करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित पाच जणांच्या टोळीविरुद्ध मोकानुसार कारवाई करण्यात आली आहे

शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवघ्या 35 ते 40 दिवसांत सराईत तीन टोळीवर मोकानुसार कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.