_MPC_DIR_MPU_III

Pune News : कोयत्याचा धाक दाखवून तरुणाच्या खिशातील रक्कम व मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – घराचे भाडे देण्यासाठी गेलेल्या तरुणाला अडवून कोयत्याचा धाक दाखवत खिशातील 80 रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा भागात ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अक्षय गोरखे (वय 24, रा. वाघोली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय 21) आणि राकेश उर्फ सुरेश साळवे (वय 22, दोघेही रा. यशवंतनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घराचे भाडे देण्यासाठी पैसे आणण्यास जात होता. यावेळी आरोपी हातात कोयते, बांबू व घातक शस्त्र घेऊन थांबले होते. आरडाओरडा करत परिसरात दहशत माजवत होते. त्यांनी अक्षयला अडवून कोयत्याचा धाक दाखविला. त्याच्या खिशातील 80 रुपये व दहा हजार किंमतीचा मोबाईल काढून घेत मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कामावरुन घरी जात असलेल्या समीर कुरेशी यांनाही धमकाविले आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.