Pune News : ससूनच्या 450 हून अधिक निवास डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षभरापासून ससूनमध्ये कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या 450 हून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाण्याचा इशारा दिला आगे. सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही संपावर जाऊ, अशी भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतली आहे.

मागील वर्षभरापासून ही निवासी डॉक्टर कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी काम करत आहेत. या काळात त्यांना दिले जाणारे इतर प्रशिक्षण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. जर त्यांना इतर प्रशिक्षण मिळाले नाही तर भविष्यात पब्लिक हेल्थ वर याचा परिणाम होईल. अभ्यासाचे एक वर्ष फक्त कोविड ड्युटीमध्ये गेले आहे. वर्षभर आम्ही प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यांच्या हातात एका वर्षाचा कालावधी होता. या काळात प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती शक्य होती.

मात्र, प्रशासनाने तसे केले नाही. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या दुसऱ्या लाटेतही आम्हाला कोविड आणि नॉन कोविड ड्युटी लावण्यात आल्या आहे. त्यामुळे आम्ही शिकायचे कसे आणि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने लवकरात लवकर आमचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे वाढत असलेली रूग्ण संख्या तर दुसरीकडे कमी पडत असलेली आरोग्य यंत्रणा यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान तयार झाले असतानाच आता निवासी डॉक्टरांचा या मागण्यांमुळे सरकार समोर पुन्हा एकदा अडचण निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.