Pune News: पुणे विभागातील 70 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे

Pune News: More than 70 percent of patients in Pune division cured पुणे जिल्ह्यात 2 हजार 432, सातारा जिल्ह्यात 293, सोलापूर जिल्ह्यात 446, सांगली जिल्ह्यात 355 तर कोल्हापूर जिल्ह्यात 577 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 1 लाख 14 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 62 हजार 884 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या 43 हजार 992 इतकी आहे. कोरोना बाधीत एकूण 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

शनिवारी (दि.15) रात्री नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकूण 7 लाख 93 हजार 4 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 62 हजार 884 नमुन्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 103 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 432, सातारा जिल्ह्यात 293, सोलापूर जिल्ह्यात 446, सांगली जिल्ह्यात 355 तर कोल्हापूर जिल्ह्यात 577 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 22 हजार 397 रुग्णांपैकी 93 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 26 हजार 15 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 817 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.44 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 129 रुग्णांपैकी 3 हजार 644 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 195 रुग्णांपैकी 8 हजार 759 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 844 आहे. कोरोनाबाधित एकूण 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 5 रुग्णांपैकी 2 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 3 हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 158 रुग्णांपैकी 6 हजार 214 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 7 हजार 569 आहे. कोरोनाबाधित एकूण 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.