Pune News : कोरोना असूनही एक कोटींहून जास्त परवाना शुल्क जमा !

एमपीसी न्यूज : कोरोना लॉकडाऊन काळात आराेग्य विभागाच्या परवाना नुतनीकरण प्रक्रिया सुरूच होती. त्या माध्यमातून गेल्या वर्षभरात महापालिकेला एक काेटी रुपयांहून अधिक महसुल जमा झाला आहे. विशेष म्हणजे काेराेना परिस्थितीमुळे परवाना नुतनीकरणास मुदतवाढ दिल्यानंतर 30 लाखाहून अधिक रक्कम शेवटच्या तीन महिन्यात जमा झाली.

शहरातील लाॅज, मंगल कार्यालये, सलून, ब्युटीपार्लर, अंडेविक्री, भुर्जी विक्री, धान्यभट्टी, आईस फॅक्टरी, कातडीसाठा, पानपट्टी, ऊस रसाचे गुऱ्हाळ, पाळीव जनावरे विक्री, घाेडा व्यावसाियक आदींना व्यवसाय परवाना महापालिकेच्या आराेग्य विभागाकडून दिला जाताे. मार्च महिन्यात काेराेनाच्या परिस्थितीमुळे लाॅकडाऊन केला गेला. त्यानंतर परवाना नुतनीकरण करणे शक्य नव्हते.

महापालिकेच्या आराेग्य विभागातील बहुतेक कर्मचारी हे काेराेना ड्युटीत व्यस्त हाेते. त्यामुळे परवाना नुतनीकरण, नवीन परवाना देणे, त्याचे शुल्क स्विकारणे आदी कामे पुर्णपणे हाेणे शक्य नव्हते. राज्यात ऑगस्ट महिन्यापासून अनलाॅक प्रक्रीया सुरू झाल्यानंतर परवाना नुतनीकरणाच्या कामाला वेग मिळाला. अनेक व्यावसायिकांना त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करणे शक्य झाले नव्हते, तसेच परवाना नुतनीकरणाची मुदत संपल्यानंतर त्यावर विलंब आकार, तडजाेड शुल्क आकारले जाते. काेराेनाच्या परिस्थतीमुळे अनेकांना परवान्याचे नुतनीकरण करता आले नव्हते, त्यांना संधी देण्यासाठी त्याची मुदत डिसेंबर महिन्यापर्यंत वाढविण्यात आली हाेती. केवळ परवाना नुतनीकरण शुल्क घेण्याचा निर्णय झाला हाेता. या निर्णयाचा फायदा व्यावसायिकांनी करून घेतला आहे.

महापालिकेकडे वर्षभरात एकुण 1 काेटी 2 लाख 4 हजार 390 इतके शुल्क जमा झाले. त्यापैकी ऑक्टाेबर ते डिसेंबर या कालावधीत जमा झालेले शुल्क पुढील प्रमाणे :
ऑक्टाेबर : 9 लाख 19 हजार 158 रुपये
नाेव्हेंबर : 11 लाख 62 हजार 718 रुपये
डिसेंबर : 11 लाख 87 हजार 606 रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.