Pune News: खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

एमपीसी न्यूज – कान्हेफाटा आणि मळवलीतील रेल्वे उड्डाणपुलाच्या (रेल्वे ओव्हरब्रिज) कामासाठी रेल्वे गेट बंद करण्याकरिता ना-हरकत दाखल्याची आवश्यकता लागते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेल्वे विभागाला तत्काळ ना-हरकत दाखला देण्यात यावा, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.

खासदार बारणे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेतली. त्यांना रेल्वे ब्रिजच्या कामाची आवश्यकता सांगितली. त्यावर जिल्हाधिकारी देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच रेल्वे विभागाला ना-हरकत दाखला देण्याची ग्वाही दिली.

खासदार बारणे म्हणाले, कान्हेफाटा आणि मळवलीतील रेल्वे उड्डाणपुलाला (रेल्वे ओव्हरब्रिज) रेल्वे विभागाने मान्यता दिली आहे. त्या कामासाठी केंद्र, राज्य सरकारने मोठा आर्थिक निधी दिला आहे. ब्रिजचे काम करण्यासाठी रेल्वे गेट बंद करावे लागणार आहे.

त्यासाठी जिल्हाधिका-यांचा ना-हरकत दाखला आवश्यक असतो. त्याकरिता रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे.

या कामासाठी तत्काळ रेल्वेगेट बंद करण्यास परवानगी द्यावी. त्यानंतर पुढील कार्यवाहीला वेग येईल, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्याला जिल्हाधिका-यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात-लवकर ना-हरकत दाखला रेल्वे विभागाला देण्यात येईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.