Pune News : खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना वॉरियर्सना बांधली राखी

एमपीसी न्यूज – कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करून कित्येक रुग्णांना जीवदान दिलेल्या कोरोना वॉरियर्स बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी राखी बांधून औक्षण केले.

शहर राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व कोरोना वॉरियर्सनी केलेल्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व आभार व्यक्त केले. तसेच रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून औक्षण केले. या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, अर्चना घारे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी ससून हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. अजय तावरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंडे, पोलिस उपनिरीक्षक मोरे, कीटक फवारणी विभाग, पुणे महापालिका गिरीश कळसकर, दिनेश जाधव, स्वच्छता मुकदम राजू गायकवाड, गोपाळ जांभे, रुग्णवाहिका चालक शरद बोकरे, योगेश कदम, स्मशानभूमीतील कर्मचारी अरुण जंगम, पत्रकार सागर जाधव, स्वयंसेवी संस्था मैथ्यू मथान यांना सुप्रिया सुळे यांनीं राखी बाधली व कोविड योद्धा सन्मानपत्राने गौरव केला.

मृणालिनी वाणी, महेश हांडे, सचिन घोटकुल, विशाल मोरे, गणेश नलावडे, मोनिका झुरूंगे, नीलक्षी खिरीर, सुषमा सातपुते, विजया भोसले, अक्षदा राजगुरू, रेणुका चलवादी, स्नेहल पायगुडे, श्रद्धा जाधव, कृतिका राजेमहाडीक, प्रेमा पाटोळे, ऋतुजा देशमुख, सोनाली गाडे, आबोली सुपेकर, अभिषेक जाधव आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष अश्विनी परेरा व जिल्हा अध्यक्ष पूजा बट्टेपाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.