Pune News : शहरात म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शन होत असून याविषयी तातडीने उपाय योजना करा : आबा बागुल

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून त्यांच्यावर मनपा रुग्णालये, खाजगी व शासकीय रुग्णालये येथे उपचार केले जातात. या आजारातून मुक्त झाल्यानंतर रुग्णांना काही दिवसानंतर विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन होत असल्याचे आढळून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शन होत असून हे इन्फेक्शन प्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण व मधुमेह असलेले रुग्णांना होण्याचा संभव आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपयोग योजना करा, अशी मागणी काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी आयुक्तांकडे केली आहे.

हे इन्फेक्शन नाकाच्या आजूबाजूस होते. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये जावून रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते असे तज्ज्ञांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. हे इन्फेक्शन जबडा, दात, डोळे व मेंदूपर्यंत पसरत आहे. याविषयी लक्षणे आढळल्यास तातडीने उपचारांची आवश्यकता असून यावरील उपचार देखील महागडे असून गोरगरीबांना असे इन्फेक्शन झाल्यास त्यांना उपचार घेणे शक्य नाही. सबब कोरोना होवून गेलेले रुग्णांचे तोंड व डोळे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करणे गरजेचे झालेले आहे. अन्यथा यामुळे देखील मृत्यूचा दर वाढू शकतो.

पुणे शहरात म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शनचे रूग्ण आढळून येत आहेत. पुणे शहरातीन खाजगी रुग्णालयातून कोविड होऊन गेलेल्या रुग्णाचे डोळे म्युकरमायकोसिस फंगल इन्फेक्शनमुळे काढण्यात आले आहे अशी खात्रीदायक माहिती मिळाली आहे. या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी वेळीच पुणे महापालिकेस पावले उचलावी लागणार आहेत. यासाठी आवश्यकता भासल्यास डॉक्टरांचा स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करण्यात यावा.

पुणे महापालिकेकडून ज्या रुग्णांना कोविड होऊन गेला आहे व ज्या रुग्णांना मधुमेहासारखे आजार आहेत अशा रुग्णांची नियमित तपासणी करणेकामी तातडीने उपाय योजना राबविण्यात याव्यात. याविषयी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक तातडीने बोलविण्यात यावी, अशी मागणी आबा बागुल यांनी महापौर व महापालिका आयुक्त यांचेकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.