Pune News : इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा : प्रकाश आंबेडकर

0

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपावर हा गंभीर गुन्हा आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

नवी पेठ पुणे पत्रकार भवनात वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले, निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात जर चुकीची माहिती दिली असेल तर तो गुन्हे शाखेच्या अखत्यारीत येतो, पण लोक निवडणूक आयोगाकडे तक्रारी का करतात हे समजत नाही. राजकारणी हे ज्ञानी असतो पण काही साधायचं असेल तर अज्ञानी असल्याचं सोंग घेतो. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते शरद पवार यांनी यावर मत व्यक्त केले आहे. इभ्रत राखायची असेल तर राजीनामा घ्यावा. जसं घरात होतं तसं सत्तेतही होतं, भांड्याला भांडी लागतात आवाज होतोच. सरकार पाडायचा का टिकवायचं हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवावं, असेही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

27 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन…
ज्या प्रमाणे एनआरसी, सीएएला पाठिंब्यासाठी प्रति शाहीनबाग आंदोलन झाले होते. त्याप्रमाणे दिल्लीतील शीख शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा शेतकरी आंदोलनाला कृतीशील पाठिंबा दर्शविण्यासाठी सर्व शहरे, जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.