Pune News : मुंढवा येथील अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका झोन क्र. 4 येथील मुंढवा येथील घोरपडी, बालाजी मंदिराजवळ व निगडेनगर येथे अनधिकृत बांधकामावर पुणे पालिकेमार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत 14 हजार 375 चौ. फुट. क्षेत्र मोकळे करण्यात आले.

या कारवाईमध्ये बाळू मेकला व इतर यांचे 6 हजार चौ. फुट, चेन्नया व इतर यांचे 4 हजार 800 चौ. फुट, सुभाष तुकाराम निगडे व इतर यांचे 3 हजार 575 चौ. फुट असे एकूण 14 हजार 375 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

ही कारवाई जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर, बिगारी सेवक व पोलीस बंदोबस्त यांच्या सहाय्याने करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.